तेज खबरेंमहाराष्ट्र

जातीय सलोखा राखण्यासाठी सांगली जिल्हा मुस्लिम समाज पोलिस प्रशासनाला सहकार्य करणार

मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकारी यांची जिल्हा पोलीस प्रमुखाशी चर्चा

PKD NEWS CHANNEL:-  अनीस फय्याज दफेदार सांगली महाराष्ट्र

समाजात जातीय सलोखा राखण्यासाठी सांगली जिल्ह्यातील मुस्लिम समाज पोलीस प्रशासनाला संपुर्ण सहकार्य करणार असून *आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोरपणे कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुखांना देण्यात आले*.

*मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि सांगली जिल्हा मुस्लिम समाजच्या वतीने जिल्हा पोलिस प्रमुख बसवराज तेली यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले*.सद्याच्या परिस्थितीत काही समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट करत आहेत.स्टटेस ठेवत आहेत.त्यांच्यावर वेळीच कारवाई करावी. या परिस्थितीत काही जुने व्हिडीओही व्हायरल केले जाण्याची शक्यता आहे.

*सांगली जिल्ह्यात हिंदू आणि मुस्लिम हा दोन्ही समाज गुण्या गोविंदाने रहात आहे.मात्र काही समाजकंटक मग ते कोणत्याही धर्माचे असोत ते शांतता सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे*.असं यावेळी बोलताना मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी झालेल्या चर्चे दरम्यान बोलताना सांगितले.*मुस्लिम समाजातील धर्मगुरू आणि नागरिक यासंबधी तरुणांचे प्रबोधन करनार आहेत*. समाजात जातीय सलोखा रहावा यासाठी मुस्लिम समाज पोलीस प्रशांसनाला सहकार्य करणार आहे.त्यादृष्टीने तरुणांचे प्रबोधन करताना त्यांना या घटनेचे गांभीर्य समजावून सांगत आहेत. समाजात शांतता कायम राहील यादृष्टीने प्रयत्नशील राहू..

*मात्र अशा घटनांचा संदर्भ घेऊन कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या तरुणांना वेळीच पायबंद घालावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली*. शांतता राखण्यासाठी आपण घेतलेली भूमिका योग्य असून पोलीस प्रशासन दक्ष आहे.अस जिल्हापोलिस प्रमुखांनी संगितले.यावेळी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफिन सद्दाम सय्यद, महासचिव सुफियांन पठाण,मौलाना कलिंम मुल्ला मौलाना अझर,मौलाना जुबेर,जतचे मौलाना असिफ,आणि मुफ्ती युसूफ,तासगवचे हाफिज इसहाक आणि अब्दुल भाई,वाळव्याचे हाफिज उमर पटेल,कुपवाडचे हाफिज गौस,असिफ अत्तार, इमरान बेग,उमर करीम, हाजी जावेद ,हाफिज इलियास, वसीम भाई मौलाना साहिल यांच्यासह जिल्ह्यातील मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

error: Content is protected !!
Close